Monday, February 10, 2025 06:24:41 PM

World Marathi Literature Conference
पुण्यात तीन दिवसीय विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आजपासून तीन दिवसीय विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे.

पुण्यात तीन दिवसीय विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

पुणे : पुणे : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आजपासून तीन दिवसीय विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत साहित्य संमेलन सुरु असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विश्व मराठी साहित्य संमेलन 2025 या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. 

हेही वाचा :  'भाजप ईव्हीएम सेट करते, महाराष्ट्र संकटात' संजय राऊतांची परखड टीका

आज तिसऱ्या मराठी संमेलमामध्ये आपलं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतं आहे. परदेशातून आलेल्या मराठी जणांचे आभार मानतो. पुण्याची मराठी प्रमाण मराठी आहे. याठिकाणी विश्व मराठी साहित्य संमेलन होत आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. हा अभिजात दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे मनापासून आभार मानले आहेत. आपण मधू मंगेश कर्णिक यांचा सत्कार केला आहे. हे आमच्या मराठीचा सत्कार करणारे आहेत.स्वातंत्र्य वीर सावरकरांशिवाय आपण मराठी विचार करू शकत नाही. काल दिल्लीमध्येही साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उदघाटन केले. स्वतःला भाग्यवान समजतो.वाद निर्माण झालाचं नाही तर ते साहित्य संमेलन असू शकत नाही. त्यामुळे वाद निर्माण झालाच पाहिजे.कुणी नावं ठेवली किंवा कोणी चांगलं म्हणलं तरी आपण अशी संमेलन आयोजित करत राहणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. जगाच्या पाठीवर सर्व देशात मराठी माणसं आहेत. जेव्हा जेव्हा संमेलन असेल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असे उद्गार त्यांनी काढले. 

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात जीबीएसचा नवीन रुग्ण आढळला
 

मराठी भाषेला राज मान्यता छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आमची मराठी काही किलोमीटरवर बदलते पण तीची गोडी वाढत जाते. मराठी माणूस कधी स्वार्थी राहिला नाही. पुढच्या 5 वर्षात एकदा संमेलन परदेशात झालं पाहिजे अशी अजित पवारांनी इच्छा व्यक्त केली. तसेच आगामी 5 वर्षात एक संमेलन आपण परदेशात घेऊ. दिल्लीतील मराठी शाळाना आपण निश्चित मदत करू असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

 

 

विश्व मराठी संमेलनाचा कसा असेल आजचा कार्यक्रम ?

सकाळी 9 वाजता बालगंधर्व रंगमंदिर ते फर्ग्युसन महाविद्यालय शोभायात्रा 
सकाळी 11 वाजता उद्घाटन 
ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक याना साहित्यभूषण पुरस्कार 
संगीतकार कौशल इनामदार यांचा 'लाभते आम्हास भाग्य बोलतो मराठी' हा कार्यक्रम 
दुपारी 1:15 वाजता 'माझी मराठी भाषा अभिजात झाली' यावर परिसंवाद 
दुपारी 3:30 वाजता नव्या-जुन्यांचे कवी संमेलन
सायंकाळी 5.45 वाजता आंतरराष्ट्रीय मंच उपक्रमांचे सादरीकरण 
हे कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंच इथे होतील
सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजता 'महाराष्ट्राची महासंस्कृती' सांस्कृतिक कार्यक्रम  
हे कार्यक्रम प्र. के. अत्रे. सभागृह (अँम्फी थिएटर) इथे होणार 

 


सम्बन्धित सामग्री