बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरीही या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आंधळेला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सरकारकडून यात जाणिवपूर्वक चालढकल केली जात असून धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडे पुरावे देवूनही अद्याप कारवाई का नाही? असा सवालही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अनेक गुन्ह्यांत फरार आहे. तो सायको असून आता राज्याबाहेर निसटला असावा असा दावा सुरेश धस यांनी केला आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अन्य राजकीय नेत्यांनी केली आहे. करूणा शर्मा यांनी केलेले आरोप हे सत्य असावेत अशी प्रतिक्रिया देत धस यांनी मुंडेंच्या पश्रातील लोकच त्यांचा राजीमाना मागत असल्याचे धस यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आमदार सुरेश धस यांनी केला खळबळजनक खुलासा
संतोष देशमुख हत्या प्रकऱणी पोलिसांनी विविथ स्तरावर तपास केला असला तरी याचा तपास पूर्ण करण्यात आणि यातील मुख्य आरोपी फरार असल्याने सरकारला हा तपास पूर्ण करायचा आहे की काही लोकांना पाठिशी घालून वाचवायचे आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.