छत्रपती संभाजीनगर : यंदा उन्हाळ्यात उष्णतेच्या झळा राज्यातील सर्वच भागात होताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात बऱ्यात ठिकाणी पाण्याचा दुष्काळ आहे. मराठवाड्यातील अनेक गावात पाण्याचा स्त्रोतच उरला नसल्याचे चित्र आहे. गावातील विहिरी आटल्या, बोअरवेलचे पाणी संपले, तर तलाव देखील कोरडीठाक पडली आहेत. सध्या मराठवाड्यात तब्बल १८३७ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. पाणी टंचाईच्या झळा आता मराठवाड्यात अधिकच तीव्र होताना दिसत आहे. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात देखील ५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर लघु प्रकल्प कोरडे ठाक पडले आहे. सर्वाधिक झळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बसत असून येथे ६९८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.