Thursday, March 20, 2025 04:13:52 AM

Delhi Election Results 2025: दिल्लीतील निकालाचे परिणाम महाराष्ट्रात जाणवणार?

दिल्लीत भाजापाने एकहाती सत्ता मिळवल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याचे संकेत आहेत.

delhi election results 2025 दिल्लीतील निकालाचे परिणाम महाराष्ट्रात जाणवणार

दिल्ली : दिल्लीत भाजापाने एकहाती सत्ता मिळवल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याचे संकेत आहेत. दिल्लीत भाजपाने काँग्रेसला एकही जागा जिंकू दिली नाही. भाजपाने त्यांच्या निवडणूक रणनितीत काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा केली असून भाजपा त्यादृष्टिने एक एक पाऊल टाकत आहे. दिल्लीतील पराभवामुळे यापुढील निवडणुकांमध्ये आपला राजकीय पटलावरील लढाई लढताना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.दिल्लीत सलग सत्ता उपभोगणाऱ्या आपने भाजपाला अन्य राज्यात आव्हान देण्याची भाषा केली होती. मात्र, दिल्लीत झालेल्या पराभवानंतर आप पक्षाचे राजकीय अस्तित्व टिकवणं कठिण असल्याचं सांगितलं जातं आहे.

आगामी निवडणुकांत भाजपाची सरशी?

केंदात सत्ता असतानाही भाजपाला दिल्ली काबीज करता आली नव्हती
आता दिल्ली काबीज केल्यामुळे भाजपाचा विश्वास बळावला
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपा नवी रणनिती आखणार
दिल्लीच्या विजयामुळे 'ऑपरेशन टायगर'सारख्या मोहिमांना बळ
दिल्लीनंतर भाजपाचे बिहारमधील निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत 
बिहारमध्ये कमळ फुलल्यास उत्तर भारतात भाजपाची सरशी
हेही वाचा : Delhi Election Results 2025: मोदींनी दिल्लीही जिंकली; आता केंद्रासह देशावर भाजपाचे अधिराज्य
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला विजयश्री मिळत असल्याने यापुढील निवडणुकीत शत प्रतिशत भाजपा यावर प्रामुख्याने लक्ष्य केंद्रीत केले जाईल. 


सम्बन्धित सामग्री