अमरावती : अमरावतीत माजी मंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी बंजारा महिलांसोबत नैसर्गिक रंग लावून धुलिवंदन साजरा केला. यावेळी ठाकूर यांनी महिलांना रंग लावत होळी व धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारमध्ये जातीय दंगली भडकवण्याचं काम सुरू असल्याचा घणाघात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
यशोमती ठाकूर यांनी महिलांसोबत बंजारा नृत्य सादर केलं. त्यासोबतच ढोलकी सुद्धा वाजवण्याचा आनंद यशोमती ठाकूर यांनी घेतला. यानंतर त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. आता जे सुरू आहे.ते अतिशय धक्कादायक आहे. ज्याला आदर्श शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला तोच पाण्याअभावी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांकडे काही बघायचं नाही तर फक्त जातीय दंगली फडकवायच्या आहेत.
हेही वाचा : महालक्ष्मी मंदिरातील 51 तोळे दागिने चोरी प्रकरणातील सहा आरोपी जेरबंद
हा रंगाचा महोत्सव आहे. या रंगांमध्ये सगळे सामील होत असतात. त्यामुळे या सरकारला देव सुबुद्धी देवो व सरकार शेतकऱ्याचे भलं करो. शंभर दिवसाच्या आत एका मंत्राचा राजीनामा द्यावा लागतो. आता दुसऱ्या तिसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. भ्रष्टाचारी लोक सत्तेत बसले आहेत. ही वास्तविकता असल्याची टीका यशामध्ये ठाकूर यांनी केली.