राज्यात रेडिरेकनर दरात सरासरी 3.53% दरवाढ

रेडीरेकनरच्या दरात ३.५३ टक्के दरवाढ शासनाने केली. तर राज्यभरात मनपा क्षेत्रात ५.९५ टक्के तर ग्रामीण भागात ३.३६ टक्के दरवाढ करण्यात आली आहे.

राज्यात रेडिरेकनर दरात सरासरी 3.53% दरवाढ

महाराष्ट्र: रेडीरेकनरच्या दरात 3.53 टक्के  दरवाढ शासनाने केली. तर राज्यभरात मनपा क्षेत्रात 5.95  टक्के तर ग्रामीण भागात 3.36 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता घरांच्या किमतीत वाढ होणार आहे. कोरोना संकटामुळे राज्य सरकारने मागील तीन वर्षात रेडीरेकनरच्या दरात वाढ केली नव्हती. त्यामुळे यावर्षी दरवाढ होणार हे निश्चित होते. 

त्यासाठी जिल्हा पातळीवरून शिफारशी देखील मागवण्यात आला होत्या.  राज्य सरकारने ग्रामीण क्षेत्रात 3.36 टक्के तर प्रभाव क्षेत्रात 3.29 टक्के नगरपालिका क्षेत्रात 4.97 टक्के आणि मनपा क्षेत्रात 5.95 टक्के रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरात मनपा क्षेत्रात ३.५३ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता घराच्या किमतीमध्ये देखील वाढ होणार आहे.

हेही वाचा: आर्थिक वर्षाला सुरुवात; देशात अनेक मोठे बदल होणार

रेडिरेकनर म्हणजे काय? 
रेडीरेकनर (Ready Reckoner) म्हणजे एखाद्या स्थावर मालमत्तेची (property) शासनाने निश्चित केलेली किमान किंमत (minimum price) किंवा मूल्यदर तक्ता (value rate table), जी मालमत्ता व्यवहार आणि कर आकारणीसाठी (tax assessment) वापरली जाते. 

रेडी रेकनरमध्ये किती वाढ? 
पुणे – 4.16 टक्के 
पिंपरी-चिंचवड- 6.69 टक्के 
ठाणे- 7.72 टक्के 
नवी मुंबई – 6.75 टक्के 
मुंबई – 3.39 टक्के 
सोलापूर- 10.17 टकके 
अमरावती- 8.03 टक्के 
अकोला- 7.39 टक्के 
नाशिक -7.31 टक्के 
लातूर- 4.01 टक्के 
पालिका क्षेत्र- 5.95 टक्के
ग्रामीण क्षेत्र – 3.36 टक्के 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number