भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. आज (4 फेब्रुवारी) सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टीत जबरदस्त उसळी दिसून आली. सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला तर निफ्टी 50 ने 23,500 चा महत्त्वाचा टप्पा पार केला.
गुंतवणूकदारांना मिळाला जबरदस्त नफा!
BSE वरील कंपन्यांचे बाजारमूल्य तब्बल 4.5 लाख कोटींनी वाढले!
419.5 लाख कोटींवरून थेट 424 लाख कोटी रुपयांवर पोहोचले!
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
शेअर बाजारात तेजी का आली?
जागतिक बाजारात सकारात्मक संकेत – आशियाई बाजारातही तेजी
डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय – कॅनडा आणि मेक्सिकोवरील टॅरिफला स्थगिती
रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता – 6.25% पर्यंत होऊ शकतो
हेही वाचा: मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर!
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. या बातमीचा उद्देश केवळ माहिती देण्यापुरता आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.