पगार 25 हजार? मग ही बातमी वाचाच! PF बाबत मोठी अपडेट; 51 लाख कर्मचाऱ्यांना धक्का?

New EPFO Rules : जर तुम्हीही नोकरी करत असाल आणि दर महिन्याला तुमच्या पगारातून काही रक्कम ही भविष्यासाठी बाजूला ठेवली जात आहे, तर ही बातमी नक्कीच तुमच्याच कामाची आहे

पगार 25 हजार? मग ही बातमी वाचाच! PF बाबत मोठी अपडेट; 51 लाख कर्मचाऱ्यांना धक्का?
PF बाबत आली मोठी अपडेट

जर तुम्हीही नोकरी करत असाल आणि दर महिन्याला तुमच्या पगारातून काही रक्कम ही भविष्यासाठी बाजूला ठेवली जात आहे, तर ही बातमी नक्कीच तुमच्याच कामाची आहे. केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या टेक-होम सॅलरीवर होणार आहे, अशी माहिती सध्या समोर आली आहे.

कर्मचाऱ्यांना काय फायदा?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO च्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आधी यापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांचा कमीत कमी पगार हा 15 हजार रुपयांपेक्षा जास्त होता, त्यांना EPFO चे कव्हरेज थेट मिळत नव्हते. बऱ्याच कंपन्या त्यांना या योजनेमधून वगळत होत्या. मात्र, आता सरकारने ही वेतनमर्यादा वाढवली आहे.

हेही वाचा-फोनचा वापर आपण करायचा, फोनने आपला वापर नाही! Digital Detox म्हणजे नेमकं काय?

आता ही वेतनमर्यादा 15,000 ते 25,000 रुपये इतके मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचाही EPFO मध्ये समावेश केला आहे. याचा अर्थ आता असा होतो की, पगार श्रेणीतील कर्मचाऱ्यांना आता अनिवार्यपणे पीएफ, पेन्शन आणि विमा संरक्षणाचा लाभ मिळेल. या घेतलेल्या एकाच निर्णयामुळे देशभरातील 51 लाखांहून अधिक कर्मचारी हे पहिल्यांदाच EPFO च्या कव्हरेजच्या कक्षेत येऊ शकतात.

पगार घटणार पण भविष्य सुरक्षित
या सर्व कर्मचाऱ्यांच्या EPF बतच, कर्मचारी पेश्न योजना तसेच EDLI अंतर्गत तब्बल 7 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळू शकेल. मात्र, याचा एक दुसरा ही परिणामही होणार आहे. आता तुमच्या पगारातून PF कापले जाणार असल्याने हातात येणारा पगार हा काहीसा कमी होऊ शकतो. पण, त्याच वेळी तुमच्या रिटायरमेंटसाठी मोठी रक्कम ही जमा होणार आहे. एवढेच नव्हे तर EPD पेन्शसाठी नियोक्ताकडून दिल्या जाणाऱ्या योगदानातही मोठी वाढ होणार आहे. आधी ही मर्यादा 1,250 रुपये होती, तर आता वाढून ते सुमारे 2,083 रुपये प्रति महिना होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number