Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाचमी आहे. बुधवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. डॉलरमधील स्थिरता आणि अमेरिकन बाँड डीलमधील मजबूतीमुळे सोने सतत स्वस्त होत आहे. बुधवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.30 टक्क्यांनी घसरून 96,178 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते. त्याच वेळी, 5 सप्टेंबरची एक्सपायरी डेट असलेली चांदी थोडीशी घसरण होऊन 107889 रुपये प्रति किलोवर व्यवहारासाठी उघडली. यापूर्वी, मंगळवारी, डॉलर दोन आठवड्यांच्या उच्चांकाच्या आसपास स्थिर राहिला, तर 10 वर्षांचा यूएस ट्रेझरी उत्पन्न तीन आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ राहिला.
डॉलरमधील मजबूती आणि ट्रेझरी बाँड उत्पन्नात वाढ झाल्यामुळे, सोन्याच्या किमतींवर दबाव दिसून आला आहे. तथापि, अमेरिकन टॅरिफशी संबंधित अनिश्चितता यासाठी सकारात्मक पैलू आहे. खरं तर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की ते तांब्याच्या आयातीवर 50 टक्के टॅरिफ लादतील. त्यांनी लवकरच सेमीकंडक्टर आणि फार्मा क्षेत्रांवर नवीन दर जाहीर करण्यार असल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा - मालामाल झाले गुंतवणूकदार! मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा 20 रुपयांचा शेअर बनला रॉकेट
प्रमुख शहरांतील नवीन दर -
दरम्यान, पृथ्वी फिनमार्ट कमोडिटी रिसर्चचे मनोज जैन यांनी हिंदी वृत्तसंस्था मिंटला सांगितले की, या आठवड्यातही सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून येऊ शकतात. तथापी, किरकोळ बाजारात सोन्याच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीत 24 कॅरेट सोने 98330 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 90150 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकली जात आहे.
हेही वाचा - EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 33.56 कोटी खात्यात जमा करण्यात आले 8.25 टक्के व्याज
तथापी, बुधवारी मुंबईत 24 कॅरेट सोने 98180 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकली जात आहे. याशिवाय, जयपूरमध्ये शुद्ध सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98330 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 90150 रुपये आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98180 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 90 हजार रुपये आहे.
Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!