RBI Governor Sanjay Malhotra
Edited Image
नवी दिल्ली: आरबीआयने एमपीसी बैठकीचे निकाल जाहीर केले आहेत. बैठकीत पुन्हा एकदा रेपो दराबाबत मोठा दिलासा देण्यात आला आहे. आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. याबाबत माहिती देताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, एमपीसी समितीने व्याजदरात 0.50 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत आता रेपो दर 5.50 टक्क्यांवर आला आहे.
हेही वाचा - RBI ची MPC बैठक आजपासून सुरू; रेपो रेटमध्ये बदल झाल्यास होणार तुमच्या खिशावर परिणाम
गृह आणि कार कर्जाचा ईएमआय कमी होणार -
रेपो दरात कपातीचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. म्हणजेच आता लोकांच्या गृह आणि कार कर्जाचा ईएमआय कमी होईल. याबाबात बोलताना संजय मल्होत्रा म्हणाले की, जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेच्या आधारावर महागाईचा अंदाजही 3.7 टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, राखीव प्रमाण 4 टक्क्यांवरून 100 बेसिस पॉइंट्सने कमी करून 3 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - PM Kisan Installment Date: पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी जारी होणार? जाणून घ्या
रेपो दर म्हणजे काय?
बैठकीत एसडीएफ दर 5.75 वरून 5.25 पर्यंत कमी करण्यात आला आहे. तर एमएसएफ दरही 6.25 वरून 5.75 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेपो दर हा थेट ग्राहकांशी जोडलेला आहे. या कपातीमुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो. रेपो दर हा असा दर आहे ज्यावर देशाची मध्यवर्ती बँक पैशांची कमतरता भासल्यास बँकांना कर्ज देते. रिझर्व्ह बँक रेपो दराद्वारे महागाई नियंत्रित करते.