Thursday, March 20, 2025 03:46:20 AM

'ही' सरकारी योजना देते FD पेक्षा जास्त परतावा; 31 मार्चपर्यंतचं करू शकता गुंतवणूक

योजनेअंतर्गत, 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे. 1 एप्रिलपासून या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही.

ही सरकारी योजना देते fd पेक्षा जास्त परतावा 31 मार्चपर्यंतचं करू शकता गुंतवणूक
India Money
Edited Image

Mahila Samman Yojana: केंद्र सरकारने विशेषतः महिलांसाठी सुरू केलेली बचत योजना आता लवकरच बंद होणार आहे. 2023 मध्ये सुरू झालेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेअंतर्गत, 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे. 1 एप्रिलपासून या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही. 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेची घोषणा केली होती. तथापि, यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी या योजनेचा विस्तार करण्याची कोणतीही घोषणा केली नाही. म्हणून, ही योजना 31 मार्च रोजी बंद होईल.

हेही वाचा - मुलीच्या खात्यात येतील 70 लाख रुपये! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास चमकेल तुमचं नशीब

योजनेअंतर्गत देण्यात येत 7.5 टक्के व्याज - 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. सध्या महिलांना कोणत्याही अल्पकालीन बचत योजनेवर इतके व्याज मिळत नाही. ही योजना 2 वर्षात परिपक्व होते आणि या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करता येते. या योजनेत तुम्ही किमान 1 हजार रुपये जमा करून गुंतवणूक करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही बँकेत खाते उघडता येते. याशिवाय, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये MSSC खाते देखील उघडू शकता.

हेही वाचा -  आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 25 बेसिस पॉइंट्सने कपात; कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार? जाणून घ्या

योजनेत गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित - 

या योजनेअंतर्गत फक्त महिलाच खाती उघडू शकतात. जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही तुमच्या पत्नी, आई, मुलगी किंवा बहिणीच्या नावाने या योजनेत खाते देखील उघडू शकता. ही एक सरकारी योजना आहे, त्यामुळे त्यात गुंतवलेले तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. या योजनेवर तुम्हाला पूर्णपणे निश्चित आणि हमी परतावा मिळेल. या योजनेत गुंतवणूक करण्याची वेळ फक्त 31 मार्च 2025 पर्यंत आहे आणि त्यानंतर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही. 
 


सम्बन्धित सामग्री