Friday, May 24, 2024 08:58:31 AM

पश्चिम रेल्वेवरील वाहतुक विस्कळीत; लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा

पश्चिम रेल्वेवरील वाहतुक विस्कळीत लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा

मुंबई, ८ मे २०२४, प्रतिनिधी : पश्चिम रेल्वेवरील सेवा विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. विशेष म्हणजे जलद धावणाऱ्या गाड्यांवर याचा जास्त परिणाम झाल्याचे दिसत आहे. प्रवाशी ट्रॅकवरून चालत असल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा धावत आहे. सकाळच्या वेळी लोकांची कामाला जाण्याची धावपळ सुरू असताना हा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.


सम्बन्धित सामग्री