मध्य रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! CSMT वर 75 दिवसांचा ब्लॉक; ‘या’ 8 गाड्या दादर, ठाण्यातच थांबणार

मध्य रेल्वे प्रशासनाने 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीत 75 दिवसांचा पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे.

मध्य रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! CSMT वर 75 दिवसांचा ब्लॉक; ‘या’ 8 गाड्या दादर, ठाण्यातच थांबणार
CSMT वर 75 दिवसांचा ब्लॉक, ‘या’ गाड्यांवर होणार परिणाम

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाच्या भव्य पुनर्विकास प्रकल्पाचा पुढील टप्पा पार पाडण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीत 75 दिवसांचा पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. या काळात प्लॅटफॉर्म क्रमांक 14, 15 तसेच स्टेब्लिंग लाईन 15 वर पायाभरणी व इतर तांत्रिक कामे वेगाने पूर्ण केली जाणार आहेत. या धोरणात्मक निर्णयामुळे सीएसएमटी स्थानकाकडे येणाऱ्या 8 प्रमुख मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास मुख्य स्थानकापर्यंत न होता आधीच दादर किंवा ठाणे स्थानकात टर्मिनेट (समाप्त) केला जाणार आहे.

7 एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादरमध्ये तर मंगळुरू एक्स्प्रेस ठाण्यातच थांबणार

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबरपासून नंदीग्राम एक्स्प्रेस (बल्लारशाह), हावडा एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, कोणार्क एक्स्प्रेस (भुवनेश्वर), तेजस एक्स्प्रेस (मडगाव), बिदर एक्स्प्रेस आणि लातूर एक्स्प्रेस या 7 लांब पल्ल्याच्या गाड्या सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंतच चालवल्या जातील. याशिवाय, 12134 मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेसचा प्रवास ठाणे स्थानकातच पूर्ण होईल. त्यामुळे या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पुढील प्रवासासाठी उपनगरीय लोकल किंवा इतर वाहतूक पर्यायांचा वापर करावा लागणार आहे.

हेही वाचा – लालबागच्या राजाच्या चरणी 12 दिवसांत ‘इतक्या’ कोटींचं दान; भाविकांकडून सोने, चांदी आणि दुचाकी वाहने अर्पण

प्रवाशांना पूर्व-नियोजन करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

यापूर्वी पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म 16 आणि 17 वर अशाच स्वरूपाचे काम पूर्ण करण्यात आले होते. आता पुढील टप्प्यात स्थानकाचे स्वरूप अधिक आधुनिक आणि सोयीस्कर बनवण्यासाठी हा 75 दिवसांचा ब्लॉक अत्यंत महत्त्वाचा असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कामाच्या काळात प्रवाशांना होणाऱ्या संभाव्य गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, सर्व प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number