मुंबई : मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरातील अनेक दुकानांमध्ये रविवार, 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग लागलेल्या दुकानांच्या मालकांनी सांगितले की, आग पहाटे 2.30 वाजता लागली असून जळून खाक झालेल्या बहुतेक दुकानांमध्ये मोटार स्पेअर पार्ट्सची दुकाने होती. सुमारे 4 तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली असल्याचेही आता सांगितले जात आहे. दरम्यान, सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीचे कारण अद्याप तपासले जात आहे. हेही वाचा : Ramdas Athawale : 'टूटे रिश्तों को जोड़ने चला...'; बाबासाहेबांचं नाव पुढे करत प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्यासाठी रामदास आठवलेंनी घातली साद #WATCH | Mumbai, Maharashtra: A massive fire broke out in several shops in Kurla West area of Mumbai last night. More than 10 fire brigade vehicles were deployed to help extinguish the blaze. According to affected shopkeepers, the fire started at around 2:30 AM, and most of the… pic.twitter.com/G0iqvBzGzt— ANI (@ANI) October 13, 2025