मुंबई : मुंबईत आयोजित सत्याचा मोर्चामध्ये मनसेसह मविआ आणि इतर विरोधीपक्षातील अनेक नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणांकडे लक्ष असताना दुसरीकडे ज्युनिअर ठाकरे बंधूंनीदेखील त्यांच्या एक कृतीतून उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यासपीठावर उपस्थित असताना खुर्चीवर न बसता खाली बसले. यामुळे पुन्हा एकदा दोघे ठाकरे बंधू एकत्र असल्याचे पाहायला मिळाले.