CSMT Station: मुंबईकरांनो लक्ष द्या! आता CSMT वरून ट्रेन पकडायची असेल तर आधी करावं लागणार ‘हे’ काम

रेल्वे स्थानकांना मिळणाऱ्या सातत्यपूर्ण धमक्या आणि सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने आता विमानतळाच्या धर्तीवर येथे कडक तपासणी यंत्रणा लागू केली आहे.

CSMT Station: मुंबईकरांनो लक्ष द्या! आता CSMT वरून ट्रेन पकडायची असेल तर आधी करावं लागणार ‘हे’ काम

CSMT Station: मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आता सुरक्षा कवचाने वेढले गेले आहे. रेल्वे स्थानकांना मिळणाऱ्या सातत्यपूर्ण धमक्या आणि सुरक्षेतील त्रुटी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने आता विमानतळाच्या धर्तीवर येथे कडक तपासणी यंत्रणा लागू केली आहे. यापुढे मेल आणि एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची पूर्ण तपासणी केल्याशिवाय त्यांना स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही.

सुरक्षेचे नवे नियम काय आहेत?

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सीएसएमटीवर आता 'विमानतळ मॉडेल' राबवण्यास सुरुवात केली आहे.

अनिवार्य बॅगेज स्कॅनिंग: स्थानकावर प्रवेश करताना प्रत्येक बॅग स्कॅनरमधून जाणे सक्तीचे करण्यात आले आहे. सामानाची तपासणी न झालेल्या प्रवाशांना थेट रोखले जाईल.

बॅगवर स्टिकर पद्धत: ज्या बॅगची तपासणी पूर्ण झाली आहे, त्यावर सुरक्षेचे विशेष स्टिकर लावले जाईल. यामुळे कोणत्या सामानाची तपासणी बाकी आहे, हे सुरक्षा रक्षकांना सहज ओळखता येईल.

प्रवेशद्वारांवर नाकाबंदी: लोकल प्लॅटफॉर्म किंवा तिकीट खिडकीकडून एक्सप्रेस प्लॅटफॉर्मकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. केवळ तपासणी नाक्यावरूनच प्रवाशांना आत सोडले जात आहे.

हेही वाचा – BMC Election 2026 : 'बॉम्बे महाराष्ट्रातील शहर नाही…'; भाजपच्या 'या' नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

प्रशासनाने हे पाऊल का उचलले?

सीएसएमटी हे मध्य रेल्वेचे अत्यंत संवेदनशील आणि वर्दळीचे स्थानक आहे. यापूर्वी प्रवाशांचे सामान तपासण्याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर आता अद्ययावत बॅगेज स्कॅनर बसवण्यात आले आहेत. केवळ प्रवासात सोबत असणारे सामानच नव्हे, तर 'क्लॉक रूम'मध्ये ठेवण्यात येणाऱ्या बॅगांचीही कसून चौकशी केली जात आहे.

हेही वाचा – Nitin Deshmukh: 'जीव गेला तरी चालेल, पण शिवसेनेशी…'; गुवाहाटीच्या आठवणी सांगत आमदार नितीन देशमुखांनी स्पष्ट केली भूमिका

प्रवाशांवर काय परिणाम होईल?

कडक तपासणीमुळे प्रवाशांना आता गाडी सुटण्यापूर्वी थोडे आधी स्थानकावर पोहोचावे लागेल. बॅगेतून कपड्यांव्यतिरिक्त कोणतीही ज्वलनशील किंवा संशयास्पद वस्तू नेली जाणार नाही, याची खात्री केली जात आहे. या 'हाय-टेक' सुरक्षा यंत्रणेमुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढेल आणि भविष्यात मुंबईतील इतर मोठ्या टर्मिनसवरही हीच पद्धत लागू केली जाण्याची शक्यता आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number