Mumbai BEST bus Shevpuri: बस थांबवून शेवपुरी घेणं पडलं महागात; BEST चालकावर कारवाईचा बडगा

मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेल्या एमजी रोडवर बेस्ट बसचालकाच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

Mumbai BEST bus Shevpuri: बस थांबवून शेवपुरी घेणं पडलं महागात; BEST चालकावर कारवाईचा बडगा

मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेल्या एमजी रोडवर बेस्ट बसचालकाच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शेवपुरीचे पार्सल घेण्यासाठी चालकाने भररस्त्यात बस तब्बल 20 मिनिटांहून अधिक काळ उभी ठेवल्यामुळे मागून येणाऱ्या इतर वाहनांच्या लांबलचक रांग लागली. यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. मुलुंडमध्ये शेवपुरीसाठी थांबवली बेस्टची बस जाब विचारणाऱ्या नागरिकांना चालकाने शिवीगाळ केली.

हेही वाचा- Mumbai Accident : मुंबईत भीषण अपघाताचा थरार! तब्बल 14 गाड्या एकमेकांवर आदळल्या, नेमकं काय घडलं?

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. यानंतर या घटनेची चौकशी करून संबंधित चालकावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच अखेर बेस्ट बस चालकावर कारवाई करण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेत मुलुंड आगार व्यवस्थापकाला संबंधित चालकाविरुद्ध योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बेस्टच्या जनसंपर्क अधिकारी सुचेता उतळे यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number