मुंबईकरांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी तब्बल 3 नव्या उड्डाणपुलांचे लोकार्पण उद्या होणार आहे. सायन, विद्याविहार आणि गोरेगाव येथील उड्डाणपुलांचे उद्घाटन हे उद्या, अर्थात 22 ऑक्टोबर रोजी साधारण दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या उड्डाणपुलांमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रवास हा अधिक वेगवान होईल.
यामध्ये शिव रेल्वे स्थानकावरील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल तसेच गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यावीरल असलेल्या उड्डाणपूलाचा समावेश असणार आहे. हे तीनही पूल सुरु होताच सायन, विद्याविहार, गोरेगाव या परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेषतहा रेल्वे क्रॉसिंगवरील खोळंबा संपणार असून मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास जलद आणि सुखकर होण्यास मोठी मदत होणार आहे.