Mumbai Local News : मुंबई CSMT स्थानकात रुळावर झोपला महाभाग! रेल्वेचा खोळंबा; व्हिडीओ पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात

सीएसएमटी स्थानकावर हार्बर मार्गावरील रुळावर एक व्यक्ती आरामात झोपलेली प्रवाशांना आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना दिसून आली. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत असतानाच हा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ उडाला.

Mumbai Local News : मुंबई CSMT स्थानकात रुळावर झोपला महाभाग! रेल्वेचा खोळंबा; व्हिडीओ पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Mumbai Local News : मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे आणि तिची गजबजलेली स्थानके नेहमीच घड्याळाच्या काट्यावर धावत असतात. मात्र, सोमवारी दुपारी मुंबईचे हृदय मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे एका विचित्र प्रसंगामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. एका व्यक्तीने थेट रेल्वे रुळावरच झोपून राहण्याचा ‘अतरंगी’ प्रकार केल्यामुळे रेल्वे वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला आणि हजारो प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. आता सीएसएमटीवरील हार्बर मार्गाची वाहतूक सुरळीत सुरू असून प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

भरदुपारी 3:15 वाजता घडला विचित्र प्रकार
ही घटना 16 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 3:15 च्या सुमारास घडली. सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर हार्बर मार्गावरील रुळावर एक व्यक्ती आरामात झोपलेली प्रवाशांना आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना दिसून आली. लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत असतानाच हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला. या व्यक्तीमुळे ट्रेन ना पुढे नेता येत होती, ना मागे घेता येत होती, परिणामी हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. प्रथमदर्शनी ही व्यक्ती भंगार गोळा करणारी असल्याचे समजते. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

हेही वाचा – Mumbai Traffic Changes: मुंबईकरांनो सावधान; उद्या ‘या’ मार्गावर 13 तास नो-एन्ट्री; पाहा वाहतूक पोलिसांची नवी नियमावली

ट्रेनचा कर्कश हॉर्न वाजत होता, पण स्वारी ढिम्म!
व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, जेव्हा ट्रेन जवळ आली आणि मोटरमनने वारंवार कर्कश हॉर्न वाजवले, तेव्हा ती व्यक्ती क्षणभर डोकं उचलून बघत होती आणि पुन्हा आरामात रुळावर डोकं ठेवून झोपत होती. कोणत्याही सर्वसामान्य माणसाला ट्रेनच्या आवाजाने धडकी भरेल, पण ही व्यक्ती मात्र तिथेच झोपून राहिल्याने उपस्थित प्रवासी आणि रेल्वे पोलीसही चक्रावून गेले. हजारो चाकरमान्यांना आणि प्रवाशांना या एका व्यक्तीच्या कृत्यामुळे ताटकळत उभे राहावे लागले.

नशेचा अंमल की मानसिक आजार? तपास सुरू
ती व्यक्ती मध्यधुंद अवस्थेत होता की त्याला अचानक चक्कर आली होती, किंवा त्याचे मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हते का, या सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत. हॉर्नच्या प्रचंड आवाजातही जो व्यक्ती उठत नव्हता, तो नेमक्या कोणत्या कारणासाठी तिथे झोपला होता, हे अद्याप अस्पष्ट आहे. रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत या व्यक्तीला रुळावरून हटवले आणि त्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे रेल्वेच्या सुरक्षेबाबत आणि स्थानकावरील गस्तीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा – Controversial Flyover Opens: मिरा-भाईंदरकरांचा वाहतुकीचा वनवास संपणार; मेट्रोच्या ‘या’ डबल डेकर पुलाचा मुहूर्त ठरला; पाहा कधी होणार सुरू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number