FDA Raid In APMC : सावधान! तुम्ही खाताय तो आंबा केमिकलने पिकवलेला तर नाही ना? नवी मुंबई APMC मध्ये FDA ची मोठी कारवाई

नवी मुंबईतील वाशी एपीएमसी (APMC) फळ बाजारात आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे.

FDA Raid In APMC : सावधान! तुम्ही खाताय तो आंबा केमिकलने पिकवलेला तर नाही ना? नवी मुंबई APMC मध्ये FDA ची मोठी कारवाई

FDA Raid In APMC : उन्हाळ्याचा राजा मानल्या जाणाऱ्या आंब्याबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नवी मुंबईतील वाशी एपीएमसी (APMC) फळ बाजारात आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. एका जागरूक ग्राहकाने दिलेल्या माहितीनंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे.

अशी झाली कारवाई
बाजारात काही व्यापारी उघडपणे आंब्यांवर रसायनांची फवारणी करत असल्याचे एका ग्राहकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर FDA आणि बाजार समिती प्रशासनाच्या संयुक्त पथकाने संशयित गाळ्यांवर छापे टाकले. प्रशासनाने मोठ्या प्रमाणात आंब्यांचे नमुने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लॅब रिपोर्टमध्ये रसायनांचा वापर सिद्ध झाल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

नैसर्गिक की रासायनिक? असा ओळखा फरक
केमिकलने पिकवलेले आंबे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. फळ तज्ज्ञांनी ग्राहकांना आंबा ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत:

रंग: नैसर्गिक आंबा एकसारखा पिवळा नसतो, त्यात हिरवट छटा असतात. मात्र, केमिकलने पिकवलेला आंबा दिसायला आकर्षक आणि पूर्णपणे गडद पिवळा असतो.

सुगंध: नैसर्गिक आंब्याला विशिष्ट गोड वास येतो. रासायनिक आंब्याला वास नसतो किंवा उग्र औषधी वास येतो.

स्पर्श: नैसर्गिक आंबा सर्व बाजूंनी मऊ लागतो. केमिकलने पिकवलेला आंबा बाहेरून मऊ वाटला तरी आतून कडक असण्याची शक्यता असते.

हेही वाचा – Missing Link Highway : सावधान! मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर सेल्फी, फोटो घेण्यास सक्त मनाई; थेट होणार गुन्हा दाखल

आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
कार्बाईड किंवा इतर रसायने वापरून पिकवलेले आंबे खाल्ल्याने पोटदुखी, उलट्या, जुलाब किंवा दीर्घकाळात गंभीर आजार होण्याची भीती असते. त्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांना आंबे देताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने अशा व्यापाऱ्यांवर कायमस्वरूपी वचक निर्माण करावा, जेणेकरून ग्राहकांच्या जिवाशी चाललेला हा खेळ थांबेल, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number