CM Devendra Fadnavis : राज्यातील 5,459 पोलिसांना घरबांधणीसाठी 1 हजार 768 कोटींची मंजुरी; मुख्यमंत्र्यांनी पोस्ट करत पोलिसांना दिली आनंदाची बातमी

राज्यातील पोलिसांना त्यांच्या घरबांधणीसाठी 1768 कोटी रुपये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत.

CM Devendra Fadnavis : राज्यातील 5,459 पोलिसांना घरबांधणीसाठी 1 हजार 768 कोटींची मंजुरी; मुख्यमंत्र्यांनी पोस्ट करत पोलिसांना दिली आनंदाची बातमी

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील 5,459 पोलिसांना त्यांच्या घरबांधणीसाठी 1768.08 कोटी रुपये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील पोलिसांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे की, ”जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत आपल्या पोलिसांना घरे मिळाली पाहिजे, यासाठी प्रारंभीपासून मी आग्रही राहिलो आहे. त्यामुळेच 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येने पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबविण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात ती योजना बंद केली गेली होती. नंतर पुन्हा आम्ही ती योजना सुरु केली. आज मला सांगताना आनंद होतो की, आमच्या 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून 1768.08 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

हेही वाचा : Raj Thackeray: ‘चुका तुमच्या, भुर्दंड जनतेला का?’ मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर राज ठाकरेंचा बेधडक सवाल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number