देशाच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरुन आता मोठा वाद निर्माण झालेला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागील असून, या मागणीसाठीट 2 ऑक्टोबरपासून मुंबईत देशव्यापी आंदोलन सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
आंदोलनासाठी मुंबईत मोठी तयारी
नागरिकांसाठी CJP ने या आंदोलनाची हाक दिलेली आहे. CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीने शनिवारी सीईसी ज्ञानेश कुमार यांना राजीनामा देण्यासाठी मुदत दिली होती. तीच मुदत संपल्यानंरही कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आता थेट आंदोलनाच्या मार्गावर जाण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे.
हेही वाचा-Vikhroli: ड्रग्सविरोधी पाठपुरावा करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; विक्रोळीत खळबळ
पोलिसांच्या परवानगीचा पेच कायम
सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, या देशव्यापी आंदोलनसाठी मुंबईतील आझाद मैदान हे संभाव्य ठिकाणी मानले जात आहे. मात्र, या आंदोलनाला मुंबई पोलिसांची परवानगी अजूनही मिळालेली नाही. परवानगी न मिळाल्याने आंदोलनाचे ठिकाण अद्याप अंतिम झालेले नाही.
आयोजन हे परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबाही मिळू लागलेला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 2 ऑक्टोबरच्या आंदोलना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळेच या आंदोलनाला राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने 4 ऑक्टोबरला याच मुद्द्यावर स्वतंत्र आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस पक्षानेही या मुद्द्यावर आपली भूमिका घेतली असून 28 सप्टेंबरला राज्यभर आंदोलनाची घोषणा केली आहे.
CJP ने स्पष्ट केले आहे की, हे होणारे आंदोलन फक्त राजीनाम्याच्या मागणीसाठी नसून, एसआयआर आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या महत्त्त्वाच्या मुद्द्यावर आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.