Sunday, December 07, 2025 08:39:54 PM

CM Devendra Fadnavis on Amit Shah : संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची अमित शहांकडे मदतीची मागणी

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सविस्तर निवेदनपत्र दिले.

cm devendra fadnavis on amit shah  संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची अमित शहांकडे मदतीची मागणी

मुंबई: राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या पीकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांनी केलेली मेहनत काही मिनिटांच्या पावसामुळे पाण्यात गेले. ऐन सणासुदीदरम्यान, जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 31.64 शेतकऱ्यांसाठी 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी मुंबई दौऱ्यावर होते. यादरम्यान, राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सविस्तर निवेदनपत्र दिले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

'महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान याबाबत एक सविस्तर निवेदन आज आमचे नेते, देशाचे गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांना दिले. एनडीआरएफमधून भरीव मदत महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

बुधवारी पुरग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दौऱ्यावर होते. 'मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करत मदत दिली जाईल', असेही आश्वासन यावेळी राज्य सरकारतर्फे देण्यात आले. 

हेही वाचा: Devendra Fadnavis : नेपाळसारखं मॉडेल भारतात शक्य नाही, Gen-Z च्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका

खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर

हिंगोली: ऑगस्ट महिन्यात पूरबाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. माहितीनुसार, पूरबाधीत शेतकऱ्यांची संख्या 3.04 लाख आहे, तसेच, बाधित क्षेत्र 2.71 लाख हेक्टर आहे. हिंगोलीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 231.18 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

बीड: ऑगस्ट महिन्यात बीड येथे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अशातच, बीड येथील पूरबाधित शेतकऱ्यांना 53.74 रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. बाधित शेतकऱ्यांची संख्या तब्बल 1.14 लाख आहे. 

धाराशिव: जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये पूरबाधित शेतकऱ्यांची संख्या 2.34 लाख इतकी आहे. तसेच, पूरबाधित शेतकऱ्यांना 189.61 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. 

लातूर: ऑगस्ट महिन्यात लातूरमध्ये पूर आल्याने पूरबाधित शेतकऱ्यांची संख्या 3.80 लाख इतकी आहे. अशातच, पूरबाधित शेतकऱ्यांना 2.35 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या या शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

नाशिक: ऑगस्ट महिन्यात नाशिकमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे, तब्बल 7 हजार 108 शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, प्रशासनाने याची दखल घेत पूरबाधित शेतकऱ्यांना 3.82 कोटींची मदत मंजूर केली. त्यामुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

धुळे: ऑगस्ट महिन्यात धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर आल्याने जवळपास 72 शेतकरी वाधित झाले. बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

नंदुरबार: ऑगस्ट महिन्यात नंदूरबारमध्ये जवळपास 25 शेतकरी बाधित झाले. त्यामुळे, प्रशासनाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

जळगाव: ऑगस्ट महिन्यात जळगाव जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जवळपास 17 लाख 332 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याबाबत, प्रशासनाने दखल घेत पूरबाधीत शेतकऱ्यांना 9.86 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. 

अहिल्यानगर: ऑगस्ट महिन्यात अहिल्यानगरमध्ये पूर आल्याने 140 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे, प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 6 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 


सम्बन्धित सामग्री