मुंबईसह इतर शहरात राहणाऱ्या नागरकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये CNG आणि PNG च्या दरात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांनी वाढ झाली आहे. यात जी सीएनजी 80.50 पैशाला मिळत होती ती सीएनजी आता81 पैशाला मिळणार आहे. तर PNG च्या दरात म्हणजेच घरगुती पाईप गॅसचा दरात प्रति युनिट 1 रुपयाने वाढ झाली आहे.
यावेळी मुंबईसह इतर प्रमुख शहरांमध्ये ही वाढ झाली आहे, ज्यात पुणे, नाशिक, ठाणे, मीरा-भाईंदर या शहरांचा समावेश आहे. प्रमुख शहरांमध्ये बघितलं तर पुण्यामध्ये 92.50 प्रति किलो, नाशिकमध्ये 93.65 प्रति किलो तर ठाणे आणि मीरा-भाईंदर मध्ये 80.50 प्रति किलो असं वाढलेलं आहे. याच कारण अस पाहायला गेलो तर, सरकारने घरगुती गॅस पुरवठा केंद्रात कपात केल्यामुळे कंपन्यांना महागडा आयात केलेला गॅस खरेदी करावा लागत आहे, त्यामुळे या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.