एल्फिन्स्टन पूल पुढचे दोन दिवस सुरु राहणार

राज्य सरकारने सव्वाशे वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल गुरूवारी बंद होणार असल्याचे जाहीर केले होते मात्र एल्फिन्स्टन पूल पुढचे 2 दिवस सुरु राहणार आहे.स्थानिकांच्या विरोधामुळे पूल पाडण्याचं काम लांबणीवर गेले.

एल्फिन्स्टन पूल पुढचे दोन दिवस सुरु राहणार

मुंबई : राज्य सरकारने सव्वाशे वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल गुरूवारी बंद होणार असल्याचे जाहीर केले होते मात्र एल्फिन्स्टन पूल पुढचे 2 दिवस सुरु राहणार आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे पूल पाडण्याचं काम लांबणीवर गेले आहे. सोमवारी एमएमआरडीकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत तोडगा निघाल्यास पूल पाडण्याचे काम सुरु येणार आहे. 

एल्फिन्स्टन पूल गुरुवारी रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद होणार होता. मात्र प्रभादेवी आणि परळ या परिसरांना जोडणारा एल्फिन्स्टन पूल बंद करण्याविरोधात स्थानिक रात्री आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांकडून एल्फिन्स्टन पूल बंद करण्यापूर्वी बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं. त्यावेळी स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काम बंद पाडलं. तिथे असलेला 'पूल बंद'चा फलक या आंदोलकांनी काढून टाकला. एल्फिन्स्टन जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आधी सोडवला गेला पाहिजे. तसेच पूर्व पश्चिम जाण्यासाठी पादचारी पुलाचे काम आधी पूर्ण करा मगच हा पूल पूर्णतः बंद करा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली गेली. त्यामुळे आता या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे. तो पर्यंत हा पूल असाच सुरु राहणार आहे. 

हेही वाचा : एलफिस्टन पूल पाडणार; मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका

मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला एल्फिन्स्टन पूल गुरूवारी बंद करण्यात येणार होता. पुलाची अवस्था जीर्ण झाल्याने आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग सुचवले परंतु यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. हा पूल बंद केल्यामुळे स्थानिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन पूल बंद विरोधात स्थानिकांनी आंदोलन केले. नागरिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्न अगोदर मार्गी लावा तसेच पूर्व पश्चिम जाण्यासाठी पादचारी पुलाचे काम आधी पूर्ण करा मगच एल्फिन्स्टन पूल पाडा अशी संतप्त भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number