MHADA Water Tank: वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ; पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सापडल्या अळ्या

म्हाडा कार्यालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये चक्क अळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे पाणी तपासले असता ते पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

MHADA Water Tank: वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ; पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सापडल्या अळ्या

MHADA Water Tank: मुंबईतील वांद्रे पूर्व येथील ‘म्हाडा’ (MHADA) मुख्यालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हजारो कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचे उघड झाले आहे. म्हाडा कार्यालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये चक्क अळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे पाणी तपासले असता ते पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे म्हाडा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हजारो नागरिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
म्हाडाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात दररोज हजारो नागरिक घरांच्या कामासाठी आणि लॉटरी प्रक्रियेसाठी येत असतात. याशिवाय शेकडो कर्मचारी येथे कार्यरत आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही मूलभूत गरज असताना, तेथेच अस्वच्छतेचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. पाण्यात अळ्या आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. इतक्या मोठ्या शासकीय कार्यालयात स्वच्छतेकडे इतके दुर्लक्ष कसे झाले, असा सवाल आता विचारला जात आहे.

प्रशासनाकडून टाक्या शुद्धीकरणाचा निर्णय
हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर म्हाडा प्रशासनाला अखेर जाग आली आहे. तातडीने उपाययोजना म्हणून कार्यालयातील सर्व पाण्याच्या टाक्या रिकाम्या करून त्या पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जोपर्यंत पाणी पूर्णपणे शुद्ध आणि पिण्यायोग्य होत नाही, तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, अळ्या सापडेपर्यंत प्रशासन झोपले होते का, अशी टीका आता कर्मचारी संघटनांकडून होत आहे.

हेही वाचा – Pune CNG Price Hike: पुणेकरांच्या खिशाला महागाईची झळ! मध्यरात्रीपासून CNG दरात वाढ; काय आहेत नवीन दर? वाचा

स्वच्छतेच्या मुद्द्यावरून म्हाडावर टीकेची झोड
केवळ पाण्याच्या टाक्याच नव्हे, तर म्हाडा कार्यालयातील स्वच्छतागृहे आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेबाबतही अनेकदा तक्रारी येत असतात. ‘परवडणारी घरे’ देणाऱ्या म्हाडाला आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पाहुण्यांना ‘शुद्ध पाणी’ देणेही जमू नये, ही खेदाची बाब असल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर किंवा कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number