Tukaram Munde FDA On BMC : मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये एफडीएची धाड! उशिरापर्यंत अधिकाऱ्यांकडून कारवाई; रात्रीच कॅन्टीनला ठोकलं टाळं

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये धाड टाकली आहे.

Tukaram Munde FDA On BMC : मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये एफडीएची धाड! उशिरापर्यंत अधिकाऱ्यांकडून कारवाई; रात्रीच कॅन्टीनला ठोकलं टाळं

नुकताच मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा भोंगळ कारभार समोर आला होता. मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात मिळणाऱ्या ताकाच्या ग्लासात चक्क माशी आढळली तर कांदा भजीत प्लास्टिकचा धागा सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणानंतर मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याची देखील तक्रार करण्यात आली होती.

हेही वाचा- BMC Canteen : ताकाच्या ग्लासात माशी, कांदा भजीत धागा; मुंबई मनपा मुख्यालयातील उपहारगृहाचा भोंगळ कारभार

अशातच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये धाड टाकली आहे. इतकचं नव्हे तर रात्री उशिरापर्यंत झालेल्या कारवाईत कॅन्टीन सील करत कॅन्टीनचा थेट परवानाच रद्द केला. मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्त्वाखाली एफडीएने मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर धाड टाकली. यावेळी कॅन्टीनमध्ये केवळ अन्नाचा दर्जाच खालावलेला नव्हता, तर तिथे प्रचंड अस्वच्छता पसरल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले. अनेक खाद्यपदार्थ कोणत्याही झाकणाशिवाय उघड्यावर ठेवले जात होते, ज्यावर माश्या आणि डास घिरट्या घालत होते.

महापालिका मुख्यालयातील या उपहारगृहातून दररोज शेकडो कर्मचारी आणि नागरिक जेवण-नाश्ता करतात. दररोज सुमारे 7 ते 8 हजार कर्मचारी या उपगारगृहात नाश्ता, जेवण करतात. मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहाच्या निष्काळजीपणामुळे हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हापालिका मुख्यालयातील कॅन्टीनमधील अनागोंदीची गंभीर दखल घेत एफडीएने थेट महापालिकेतच ही मोठी कारवाई केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान एफडीएच्या या कारवाईमुळे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आज जेवणाचा डबा सोबत ठेवावा लागणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number