मुंबईच्या बोरिवली परिसरात ॲनेक्स मॉलला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळावर दाखल झाल्या असून सर्वांना वेळेवर सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून सुरक्षेच्या कारणास्तव मॉल परिसर रिकामी करण्यात आला आहे. या मॉलमध्ये लागलेली आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसी सिस्टीममधील बिघाड किंवा स्फोटामुळे ही आग लागली. सुरुवातीला किरकोळ असलेली ही आग वेगाने पसरली आणि मॉलच्या पहिल्या मजल्यावर उंच ज्वाला आणि काळ्या धुराचे दाट लोट दिसत होते. त्यामुळे जवळच्या रहिवाशांमध्ये घबराट पसरली. ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्याचे काम त्वरित सुरू केले आणि संपूर्ण परिसर सील करण्यात आला. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध सुरु आहे.