Ganpati Visarjan: गिरगावात 40 फूट बाप्पाचे अनोखे विसर्जन! समुद्रात नाही, तर…

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंडळातील बाप्पाचे विसर्जन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे सकाळपासून समुद्र किनाऱ्यावर अनेकदा पूजेचे साहित्य, फुले, हार पडलेले पाहायला मिळतात. यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाचा सामना करावा लागतो.अशातच या समस्येला समोर ठेवून गिरगावच्या गणेश मंडळाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी त्यांच्या बाप्पाची विसर्जनाची पद्धत पूर्णपणे पर्यावरणपूरक केली आहे. यात 40 फूट बाप्पाची मूर्ती […]

Ganpati Visarjan: गिरगावात 40 फूट बाप्पाचे अनोखे विसर्जन! समुद्रात नाही, तर…

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंडळातील बाप्पाचे विसर्जन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे सकाळपासून समुद्र किनाऱ्यावर अनेकदा पूजेचे साहित्य, फुले, हार पडलेले पाहायला मिळतात. यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाचा सामना करावा लागतो.अशातच या समस्येला समोर ठेवून गिरगावच्या गणेश मंडळाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी त्यांच्या बाप्पाची विसर्जनाची पद्धत पूर्णपणे पर्यावरणपूरक केली आहे.

यात 40 फूट बाप्पाची मूर्ती ही मूलतः फायबरपासून बनवलेली आहे. बाप्पाला समुद्र किनाऱ्यावर नेऊन प्रतिकात्मक (प्रातिनिधिक) विसर्जन पद्धत करण्यात आली. 4 ते 5 वेळा बाप्पाचा दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर बाप्पाला परत मंडळात नेण्यात आले.फायबरच्या बाप्पाच्या मूर्तीचे भाग आता डिसमेंटल (वेगळे) करण्यात येणार असून अशा प्रकारे विसर्जन होणार आहे. त्यामुळे समुद्रात कोणतेही प्रदूषण होणार नाही, असा मंडळाचा दावा आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number