म्हाडामध्ये सरकारी नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु; अर्ज कधीपर्यंत करता येणार?वाचा

MHADA Job Vacancy :नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच म्हाडा, मुंबई याठिकाठी मोठी भरती निघालेली आहे.
golden opportunity in mhada
म्हाडामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच म्हाडा, मुंबई याठिकाठी मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेऊया, ही भरती नक्की कोणासाठी फायदेशीर आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा आहे.

पद कोणतं? जाणून घ्या
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ही भरती प्रक्रिया सेवानिवृत्त उपअभियंता या पदासाठी राबवली जाणार आहे. या भरतीअंतर्गत एकून 28 जागा उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे इच्छुत आणि पात्र उमेदवारांना मुंबई या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे. या पदासाठी शैक्षिक पात्रता ही संबंधित असलेल्या पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात आली आहे. त्यामुळेच अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज प्रक्रियेची माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय अर्ज करण्याआधी सर्व अटी आणि नियम समजून घेणे ही महत्त्वाचे आहे.

हेही वाचा-फोनचा वापर आपण करायचा, फोनने आपला वापर नाही! Digital Detox म्हणजे नेमकं काय?

कसा करायचा अर्ज?
या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. उमेदवार हे ई-मेल द्वारे देखील अर्ज पाठवू शकतात. ऑफलाइन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी आपला पूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक कागदपत्रे ‘मा. सचिव, म्हाडा, कक्ष क्रमांक 523, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051’ या पत्त्यावर पाठवावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख?
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळेच शेवटच्या तारखेची उमेदवारांनी वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा. महत्त्वाचे म्हणजे, अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरलेली असावी. अपूर्ण असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version