Tuesday, November 11, 2025 10:35:44 PM

Stenographer Recruitment: मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर भरती; 1.77 लाखांपर्यंत मिळणार पगार

उमेदवारांनी MSCE द्वारे आयोजित GCC-TBC परीक्षा किंवा तत्सम सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

stenographer recruitment मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर भरती 177 लाखांपर्यंत मिळणार पगार

Stenographer Recruitment: न्यायालयात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्टेनोग्राफर पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली असून, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण 12 स्टेनोग्राफर पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांना अर्ज bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाइटवर करावा लागेल. ही पदे उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांमध्ये भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. ज्यांनी उच्च न्यायालयात किंवा इतर न्यायालयात किमान 5 वर्षे कनिष्ठ श्रेणीतील स्टेनोग्राफर म्हणून काम केले आहे, त्यांना काही पात्रता सूट मिळेल. कायद्याची पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच, इंग्रजी लघुलेखनात प्रति मिनिट 100 शब्द आणि इंग्रजी टायपिंगमध्ये प्रति मिनिट 40 शब्द गती आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCE द्वारे आयोजित GCC-TBC परीक्षा किंवा तत्सम सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

हेही वाचा - Gold Limit for Bank Locker : आयकर नियमांनुसार बँकेच्या लॉकरमध्ये कोणाला किती 'ग्रॅम' सोने ठेवता येते?

वयोमर्यादा आणि पगार

किमान वय: 21 वर्षे
कमाल वय: 43 वर्षे (राखीव प्रवर्गास सवलत लागू)
पगार: 56,100 ते 1,77,500 दरमहा + भत्ते
(सातवा वेतन आयोगानुसार)
सर्व उमेदवारांना अर्जासाठी 1,000 शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रिया

निवड तीन टप्प्यांत होईल:
लघुलेखन चाचणी: इंग्रजीतील दोन परिच्छेद – प्रत्येकी 5 मिनिटांचे श्रुतलेखन व 30 मिनिटांचे ट्रान्सक्रिप्शन.
टायपिंग चाचणी: 10 मिनिटांत 400 शब्दांचा परिच्छेद टाईप करावा लागेल.
मुलाखत फेरी: संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

उमेदवारांनी अर्ज करताना सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच अर्ज सादर करावा. तसेच यासंदर्भात अधिक माहिती व अर्जासाठी bombayhighcourt.nic.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. 


सम्बन्धित सामग्री