महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे CJP कडून तीव्र आंदोलन छेडण्यात आले. मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावेळी लाखोंच्या संख्येने सहभागी होत नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. यादरम्यान एकाला हार्ट अॅटक आल्याची दुर्वैवी घटना घडली आहे. घोषणाबाजी सूरू असताना एक जण अचानक कोसळला होता. त्यानंतर त्याला हार्ट अॅटक आल्याची माहिती मिळाली असून आता त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
या घटनेने आंदोलनादरम्यान मोठी खळबळ माजली होती. गोपी पिल्लई असे या 75 वर्षीय आंदोलकाचे नाव असून ते केरळवरून मुंबईत आले होते. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी CJP ने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आंदोलन पुकारले होते. या आंदोलनादरम्यान केरळवरून आलेल्या 75 वर्षीय गोपी पिल्लई यांना हार्ट अटॅक आला. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तत्काळ त्यांना सीपीआर देऊन त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा जीव वाचू शकला नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.