Holi 2025: देश होळी सणाची तयारी सुरु आहे. सगळी मंडळी होळीसाठी खास कार्यक्रम राबवण्याचे नियोजन करत आहेत. कोणी सुखी रंगपंचमी साजरी करतं तर कोणी पाण्याने खेळून पण आता सण उत्तमाने साजरा करता यावा यासाठी मुंबई पोलिसांनी 12 ते 18 मार्च 2025 या कालावधीत होणाऱ्या उत्सवादरम्यान सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
तर 2 मार्चपासून सुरू झालेल्या रमजान महिन्यात जातीय तणाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पोलिस उपायुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या काळात सार्वजनिक गैरसोय होऊ शकणाऱ्या काही क्रियाकलापांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केले आहेत. जेनेकरून होळीचा आनंद घेता येईल आणि कोणतीही हानी होणार नाही.
आदेशाप्रमाणे या गोष्टींवर बंदी:
- सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द किंवा घोषणा देणे, तसेच अश्लील गाणी गाण्यावर बंदी
- हावभाव किंवा नकलांच्या माध्यमातून अश्लीलता प्रदर्शित करणे, तसेच अश्लील किंवा सभ्यतेला, नैतिकतेचा अपमान करणारे चित्रे, प्रतीके, फलक किंवा अन्य कोणतेही साहित्य तयार करणे, प्रदर्शित करणे किंवा प्रसारित करणे.
- पादचार्यांवर रंगीत पाणी, रंग फवारणे किंवा रंगाची पूड फेकणे.
- रंगीत किंवा पभरलेल्या फुग्यांचा किंवा कोणत्याही प्रकारच्या द्रव पदार्थाचा उपयोग करून ते इतरांवर फेकणे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस कायदा, 1951 च्या कलम 135 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रतिबंधात्मक उपाययोजना 12 मार्च रोजी रात्री 12:01 ते 18 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू आहेत.
या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश होळी साजरी केल्याने जातीय तणाव निर्माण होणार नाही किंवा सार्वजनिक शांततेचा भंग होणार नाही याची खात्री करणे आहे. मुंबई पोलिसांनी हा सण जबाबदारीने साजरा करण्याचे आणि सर्व नागरिकांच्या हक्कांचा आणि प्रतिष्ठेचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.