मुंबईत जमिनीखाली सुरू आहे मोठं काम! 6 प्लॅटफॉर्म, 7 किमीचा बोगदा; नेमका मार्ग कुठून-कसा?

Mumbai Bullet Train : मुंबईत वेगाने सुरू असलेल्या विकासकामांमध्ये आता बुलेट ट्रेन प्रकल्पाचीही भर पडली आहे. बीकेसी परिसरात सुरू असलेले भूमिगत स्टेशन आणि समुद्राखालून जाणारा बोगदा यामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. पण या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय?

मुंबईत जमिनीखाली सुरू आहे मोठं काम! 6 प्लॅटफॉर्म, 7 किमीचा बोगदा; नेमका मार्ग कुठून-कसा?
Mumbai Bullet Train

मुंबईकरांसाठी वाहतुकीचा आता नवा अध्याय लिहिला जात आहे. शहराच्या अगदी मध्यभागी, बीकेसीत जमिनीखाली तब्बल 100 फूट खोलवर भारतामधील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन बांधलं जात आहे आणि वर 10 मजली बिल्डिंग उभी राहील, एवढ्या खोलीवर हे काम सुरु केलं आहे.

नेमकं काय सुरू आहे?
केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं हे मुख्य स्टेशन आहे. 2027 या वर्षामध्ये ही ट्रेन ट्रॅकवर आणण्याचं टार्गेट असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच याबाबत माहिती दिलेली आहे. बीकेसीमधील 32 मीटर खाली तीन लेव्हलमध्ये हे बांधकाम सुरु आहे. यात प्लॅटफॉर्म लेव्हल, कॉनकोर्स तसेच सर्व्हिस एरिया असणार आहे.

हेही वाचा – दिवाळीपूर्वी गॅस सिलेंडरच्या दरांबाबत मोठी अपडेट; दिलासा की महागाईचा फटका?; प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या

तब्बल 400 मीटर लांबीचे यात तब्बल 6 प्लॅटफॉर्म येथे उभारले जाणार आहेत, यातील काही प्रमाणात काम पूर्ण झालेले आहे. शिवाय या कॉरिडॉरचा अजून एक भाग म्हणजे ठाणे खाडीलाचा बोगदा. चक्क समुद्राखालून जाणारा हा भारतामधील पहिलाच बोगदा असणार आहे. ज्यात तब्बल 21 किमीच्या बोगद्यापैकी सात किमीचा भाग हा थेट खाडीखाली असणार आहे. 508 किमी लांबीचा हा कॉरिडॉर मुंबईहून निघून ठाणे, विरार, बोईसर, वापी, सुरत, वडोदरा मार्गे अहमदाबाद-साबरमतीपर्यंत जाणार आहे.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number