IIT बॉम्बेमध्ये भयावह घटना! गॅस लीक होऊन हॉस्टेलमध्ये स्फोट; 5 विद्यार्थी होरपळले

IIT Bombay Shocking Incident : मुंबईतील पवई परिसरातील आयआयटी कॅम्पसमध्ये गॅस गळतीमुळे अचानक आगीचा भडका उडाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.

IIT बॉम्बेमध्ये भयावह घटना! गॅस लीक होऊन हॉस्टेलमध्ये स्फोट; 5 विद्यार्थी होरपळले
IIT Bombay Gas Leak

मुंबईतील पवई येथील आयआयटी कॅम्पसमध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक सहामध्ये गॅस गळतीमुळे अचानक आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

हॉस्टेलमध्ये नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्टेल क्रमांक सहमध्ये गॅस सिलिंडरच्या पाईपमधून गॅस गळती होत होती. ही गळती लक्षात न आल्याने अचानक फ्लेअर-अप झाला आणि आगीने रौद्ररुप धारण केले. त्यावेळी जवळच असलेल्या पाच जणांना या भडक्याची झळ बसली.

हेही वाचा-रसवंतीची गाडी जप्त केल्याचा राग अनावर! संतप्त तरुणाचा महापौरांच्या वाहनावर लोखंडी रॉडने हल्ला; महापालिकेत धिंगाणा

या घटनेत अंश अहिरवार (12), तहजीब आलम (9), ईश्वर सिंह (37), शिवकुमार सिंह (34) आणि अनिलकुमार यादव (23) हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि बीएमसीच्या वॉर्ड कार्यालयाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीवर नियंत्रण आणत गळती तातडीने रोखण्यात आली. सर्व जखमींना तातडीने राजावाडी रुग्णालात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर 4 जणांना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर एकावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number