रत्नागिरी : गणेशोत्सवानंतर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गणेशभक्तांच्या प्रवासात विघ्नांची मालिका सुरुच आहे. आधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागल्यानंतर आता कोकण रेल्वेंच वेळापत्रकही कोलमडलं आहे. गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या अनेक स्पशेल गाड्यांमुळे नियमित रेल्वेसेवर थेट परिणाम झाल्यांच समोर आलं आहे.
महामार्गानंतर आता रेल्वे प्रवासातही खोळंबा
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावरील बऱ्याच गाड्या ही तब्बल साडेचार ते पाच तास उशिराने धावत आहे. त्यामुळे मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या गणेशभक्तांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवासी गाड्यांच्या प्रतीक्षेत ताटकळलेले दिसून येत आहे. तर काही प्रवासी हे स्थानकांवर बसून गाडीची वाट पाहत आहेत, तर काही प्रवासी हे गाड्यांमध्येच बराच वेळ थांबून आहेत.
हेही वाचा-ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी, सोने-चांदीचे दर घसरले; नेमके भाव किती रुपयांनी घसरले जाणून घ्या…
सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणार गणपती विशेष गाडी ही साधारण अडीच तास उशिराने धावत आहे. तर चिपळून-पनवेल मेमोही ही सुमारे एक तास उशिराने धावत आहे. याशिवाय कुर्ला स्थानकातून सुटणारी मत्स्यंगधा एक्सप्रेस ही सुमारे एक तास उशिराने,तर तुतारी एक्स्प्रेस ही दीड तास उशिराने धावत असल्याची माहिती आहे.
गणेशोत्सवानंतर मुंबईकडे येत असलेल्या प्रवाशांची मोठी गर्दी असताना रेल्वे गाड्यांना होत असलेल्या विलंबामुळेच प्रवाशांचा खोळंबा होत आहे. आधीच रस्ते वाहतकीवर ताण असताना रेल्वेसेवाही विस्कळीत झाल्याने गणेशभक्तांना परतीच्या प्रवासाचाही आणखी त्रास वाढलेला आहे.