Richest Candidate In BMC Election: 27 ठिकाणी जमिनी, आलिशान गाड्या अन् 124 कोटींचा मालक…; कोण आहे मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार

संपत्तीत झालेल्या या अफाट वाढीमागे रायगडमधील जमिनींचा मोठा वाटा आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, ऑक्टोबर 2022 ते नोव्हेंबर 2025 या अल्प काळात त्यांनी अलिबाग परिसरात 27 शेतजमिनी विकत घेतल्या आहेत.

Richest Candidate In BMC Election: 27 ठिकाणी जमिनी, आलिशान गाड्या अन् 124 कोटींचा मालक…; कोण आहे मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार

Richest Candidate In BMC Election: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत धनदांडग्या उमेदवारांची चर्चा सुरू असतानाच, भाजपचे कुलाब्यातील उमेदवार मकरंद नार्वेकर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 9 वर्षांपूर्वी अवघ्या 6 कोटींची संपत्ती जाहीर करणाऱ्या नार्वेकरांची मालमत्ता आता 124 कोटींच्या घरात पोहोचली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू असलेल्या मकरंद यांच्या उत्पन्नातील या वाढीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

किती आहे नार्वेकरांचा संपत्ती ? 

मकरंद नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण मालमत्ता खालीलप्रमाणे आहे:

एकूण मालमत्ता: 124.65 कोटी (2017 मध्ये ही केवळ 6.3 कोटी होती).
स्थावर मालमत्ता: 93.32 कोटी (जमिनी, घरे इत्यादी).
जंगम मालमत्ता: 32 कोटी (बँक ठेवी, शेअर्स, दागिने).
गाड्यांचा ताफा: त्यांच्याकडे दोन टोयोटा फॉर्च्युनर, एक सिग्मा आणि एक मारुती ग्रँड विटारा अशी महागड्या गाड्यांची मोठी फौज आहे.
घर: कुलाब्यातील त्यांच्या आलिशान घराची सध्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे.

हेही वाचा – Nitesh Rane : 'उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा मुलगा बोलायला लाज वाटते…'; नितेश राणे यांची जहरी टीका

रायगडमधील जमिनी ठरल्या 'सोनं'

नार्वेकरांच्या संपत्तीत झालेल्या या अफाट वाढीमागे रायगडमधील जमिनींचा मोठा वाटा आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, ऑक्टोबर 2022 ते नोव्हेंबर 2025 या अल्प काळात त्यांनी अलिबाग परिसरात 27 शेतजमिनी विकत घेतल्या आहेत. त्यांच्या अलिबागच्या झिराडपाडा, किहीम, सासवणे आणि मापगाव या भागात जमिनी आहेत. अटल सेतू आणि रो-रो सेवेमुळे या भागातील जमिनीचे भाव गगनाला भिडले, ज्याचा थेट फायदा नार्वेकरांच्या नेटवर्थला झाला आहे.

हेही वाचा – BMC Election 2026: "तारुण्यात पक्षासाठी रक्त सांडलं, पण आज…" ठाकरेंवरील आरोपानंतर दगडू सकपाळांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश

नार्वेकर कुटुंबाचा पालिकेवर दबदबा?

या निवडणुकीत नार्वेकर कुटुंबाचा दबदबा पाहायला मिळत आहे. मकरंद नार्वेकर (प्रभाग 226), त्यांच्या भावजय हर्षिता नार्वेकर (प्रभाग 225) आणि बहीण गौरवी शिवलकर (प्रभाग 227) असे कुटुंबातील 3 सदस्य रिंगणात आहेत. अलिबागमध्ये आमचे गाव आहे. अटल सेतू आणि इतर विकास प्रकल्पांमुळे तिथल्या जमिनींचे भाव वाढले, त्यामुळे माझ्या स्थावर मालमत्तेचे मूल्य वाढलेले दिसत आहे, असे मकरंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number