AC Local Ticket Fare: जादा एसी लोकल तर सुरू होणार पण तिकिट दरांचं काय? सामान्यांच्या खिशावर भार पडणार की नाही, मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं…

2029-30 पर्यंत मुंबईतील बहुतांश नव्हे, तर सर्व लोकल सेवा एसी करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

AC Local Ticket Fare: जादा एसी लोकल तर सुरू होणार पण तिकिट दरांचं काय? सामान्यांच्या खिशावर भार पडणार की नाही, मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं…

मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या तीन वर्षांत मुंबई उपनगरीय रेल्वेचा ताफा पूर्णपणे वातानुकूलित करण्याच्या दिशेने मोठी पावले उचलली जात आहेत. मुंबईसाठी तब्बल 238 नव्या एसी लोकल गाड्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यांची निर्मितीही सुरू झाली आहे. त्यामुळे 2029-30 पर्यंत मुंबईतील बहुतांश नव्हे, तर सर्व लोकल सेवा एसी करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुंबई लोकलच्या आधुनिकीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबईच्या लोकल सेवेचा विस्तार आणि आधुनिकीकरण यावर चर्चा झाली. त्यानंतर 238 एसी लोकल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या नव्या गाड्यांची निर्मिती वंदे भारत ट्रेन तयार होत असलेल्या कारखान्यात केली जात असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

या निर्णयामुळे मुंबईकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एसी लोकल सुरू झाल्यानंतर सामान्य प्रवाशांच्या सेकंड क्लास तिकीट दरात वाढ केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे एसी लोकलमधून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होतानाच सध्याच्या प्रवाशांना तिकीट दरवाढीची चिंता करावी लागणार नाही. उन्हाळा आणि पावसाळ्यात गर्दीच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, मुंबईकरांना या सुविधेसाठी 2030 पर्यंत वाट पाहावी लागणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. 238 पैकी पहिली एसी लोकल 2027 मध्ये मुंबईच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने नव्या एसी लोकल ताफ्यात दाखल केल्या जातील आणि 2030 पर्यंत संपूर्ण ताफा एसी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number