Slab Collapse In Navi Mumbai : नवी मुंबईत मोठी दुर्घटना; खासगी क्लासचा स्लॅब कोसळला, पाच विद्यार्थी जखमी

क्लास सुरू असतानाच अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पसरली. या ढिगाऱ्याखाली एकूण 18 विद्यार्थी अडकले होते, त्यापैकी 5 जण जखमी झाले आहेत.

Slab Collapse In Navi Mumbai : नवी मुंबईत मोठी दुर्घटना; खासगी क्लासचा स्लॅब कोसळला, पाच विद्यार्थी जखमी

Slab Collapse In Navi Mumbai: नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात एका खासगी कोचिंग क्लासमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. क्लास सुरू असतानाच अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पसरली. या ढिगाऱ्याखाली एकूण 18 विद्यार्थी अडकले होते, त्यापैकी 5 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

विद्याभवन सोसायटीत थरार
कोपरखैरणे येथील विद्याभवन सोसायटीच्या तळमजल्यावर हा खासगी क्लास भरवण्यात आला होता. क्लास सुरू असताना पहिल्या मजल्यावरील घराचा स्लॅब अचानक खाली कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 18 विद्यार्थ्यांपैकी सुरुवातीला 10 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, उर्वरित विद्यार्थी अडकून पडल्याने बचाव कार्याचा थरार वाढला होता.

अग्निशमन दल आणि रहिवाशांकडून बचाव कार्य
स्लॅब कोसळल्याचा प्रचंड आवाज होताच सोसायटीतील रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले असून, जखमी झालेल्या 5 विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमी विद्यार्थ्यांना कोपरखैरणे येथील ‘अपेक्स’ आणि ‘साई स्नेहदीप’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – Mumbai traffic advisory: भारत-इंग्लंड सेमीफायनलपूर्वी मुंबईत ‘ट्रॅफिक अलर्ट’! वानखेडेवर जाण्यासाठी पोलिसांनी दिली ‘ही’ नियमावली

धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या भीषण अपघातामुळे नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने अनेक इमारतींना आधीच धोकादायक म्हणून घोषित केले आहे. तरीही अशा इमारतींमध्ये नागरिक आणि खासगी संस्था जीव मुठीत धरून वावरत असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. पालिका प्रशासन अशा इमारतींवर कधी ठोस कारवाई करणार, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number