Mumbai Traffic: मुंबईतील एल्फिन्स्टन पूल पाडल्याने मोठी वाहतूककोंडी; प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

प्रभादेवी पुल बंद असल्यामुळे या मार्गावरून जाणारे प्रवासी पर्यायी मार्ग शोधत असले तरी ते मर्यादित आहेत.

Mumbai Traffic: मुंबईतील एल्फिन्स्टन पूल पाडल्याने मोठी वाहतूककोंडी; प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Mumbai Traffic:  मुंबईतील एल्फिन्स्टन पूल पाडल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पूल बंद झाल्याने या मार्गावरून जाणारी वाहतूक इतर पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे, ज्यामुळे काही बसमार्ग थांबवावे लागले आहेत. त्यातून बस क्रमांक 40 हा एकमेव पर्याय राहिला असून, यावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोजच्या या गोंधळावर बेस्ट प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला असून, बसगाड्यांची संख्या वाढवून प्रवाशांना आरामदायक प्रवास सुनिश्चित केला जाणार आहे.

हेही वाचा – Mumbai Local: मुंबई लोकल वेळापत्रक विस्कळीत होणार? मध्य रेल्वेचा 18 तासांचा ब्लॉक

प्रभादेवी पुल बंद असल्यामुळे या मार्गावरून जाणारे प्रवासी पर्यायी मार्ग शोधत असले तरी ते मर्यादित आहेत. शिवाय वरळी-शिवडी मार्गावर चालू असलेल्या बांधकामामुळे प्रभादेवी पश्चिमेकडून परळ-शिवडीकडे जाणाऱ्या बस क्र. ए-162, 168, 201 फक्त प्रभादेवीपर्यंतच जात आहेत.

हेही वाचा – Mumbai Metro: मुंबई-ठाणे मेट्रोच्या विस्ताराला चालना! राज्य सरकारकडून MMRDA ला 500 कोटींचं बिनव्याजी कर्ज

दरम्यान, पूल बंद झाल्यामुळे दादर पश्चिमेकडे जाणारे विद्यार्थी आणि नागरिक आता फक्त बस क्र. 40 वापरून वीर कोतवाल उद्यानापर्यंत प्रवास करतात. त्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी इतर बसचा अवलंब करावा लागतो. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परंतु, आता बेस्टने बसच्या संख्या वाढवल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number