Monday, November 17, 2025 12:05:12 AM

Mumbai 2B Metro : मुंबईकरांसाठी खूशखबर! मंडाले ते चेंबूर मेट्रो मार्गाचा टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित मेट्रो लाईन 2 आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (MMRDA) विकसित करण्यात आलेली आहे.

mumbai 2b metro  मुंबईकरांसाठी खूशखबर मंडाले ते चेंबूर मेट्रो मार्गाचा टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

मुंबई: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित मेट्रो लाईन 2बी आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (MMRDA) विकसित करण्यात आलेली आहे. 26.2 किलोमीटर लांबीची ही मेट्रो लाईन शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एक अखंड जोड देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा कॉरिडोर दोन भागात विभागला आहे: मेट्रो लाईन 2ए (दहिसर ते डीएन नगर), जी आधीपासूनच कार्यरत आहे आणि लाईन 2बी (डीएन नगर ते मानखुर्दमधील मंडाले), जी सध्या प्रगतीपथावर आहे.

वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो लाईन 2बीचा पहिला टप्पा, मंडाले ते चेंबूरमधील डायमंड गार्डनपर्यंतच्या 5.3 किलोमीटरच्या भागाची चाचणी सुरू आहे. डिसेंबरपर्यंत हा विभाग प्रवाशांसाठी खुला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मार्गामुळे चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द परिसरातील रहिवाशांना पूर्व-पश्चिम दिशेतील प्रवास आणखी सुलभ होणार आहे. सोबतच, मेट्रो लाईन 2बीचा दुसरा टप्पा, डीएन नगर ते खारमधील सारस्वत नगर, 2026 च्या उन्हाळ्यात सुरू होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा टप्पा सुरू झाल्यानंतर, लाईन 2ए आणि 2बी जोडल्या जातील, ज्यामुळे दहिसर ते खार असा मेट्रो मार्ग तयार होईल. या विभागात ईएसआयसी नगर, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खिरा नगर आणि सारस्वत नगर ही स्थानके असतील. या प्रकल्पामुळे, लिंक रोड आणि एसव्ही रोडवरील वाहतूकीचा ताण कमी होईल अशी अपेक्षा आहे. 

हेही वाचा: Sanjay Raut Hospitalised: संजय राऊतांची प्रकृती अचानक बिघडली; भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल

मुंबई मेट्रो लाईन 2 बीच्या दुसऱ्या टप्प्यात खालीलप्रमाणे स्थानके असतील

एसिक नगर, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी हॉस्पिटल, खीरा नगर, सारस्वत नगर, नॅशनल कॉलोज, बांद्रा मेट्रो, इनकमटॅक्स ऑफिस, आयएलएफएस, एमटीएनएल मेट्रो, एसजिबर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व), इइएच, चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द, मंडाले मेट्रो.
 


सम्बन्धित सामग्री