मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे. 15 सप्टेंबर अर्थात आज, सकाळी 11 वाजता जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून मुंबईतील आंदोलनासाठी रवाना होणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी परवानगी मिळावी, या गोष्टीसाठी जरांगे पाटील यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता. त्यांचे दोन्ही अर्ज हे पोलिसांनी स्वीकारले होते. मात्र, आंदोलनाना परवानाही नाकारण्यात आलेली होती. याच दरम्यान,जरांगे पाटील यांनी 18 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा आझाद मैदान पोलिसांकडे परवानगीसाठी तिसरा अर्ज दिला होता. सध्या मुंबईत गणेशोत्सव सुरु असल्याने भाविकांची मोठी गर्दी आणि दुसरीकडे वाहतुकीची समस्या लक्षा घेता, आपण आज एकटेच आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी या अर्जात म्हटले आहे.त्यामुळे पोलिसांकडून तिसऱ्या अर्जावर काय निर्णय घेतला जात आहे, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जरांगे पाटील हे मुंबईकडे येताना चार ठिकाणी मुक्काम करणार आहेत तसेच ‘मी एकटाच मुंबईक आंदोलनासाठी जाणार आहे, त्यामुळे मराठा समजाने मुंबईत येऊ नये,’असेही आवाहान त्यांनी समाजाला केले आहे. ‘मला एकट्याला मुंबई येण्यापासून कोण थांबवत’, असा सवाल करत त्यांनी सरकारला इशाराही दिला आहे. दरम्याने न्यायालयात असून अनेक टप्प्यांवर आहेत. महत्त्वाचे म्हणजे सविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून ज्या ज्या गोष्टी करता आल्या त्या सरकारने केल्या आणि यापुढेही करण्यास तयार आहे. मात्र, कायदा-न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांच्या बाहेर जात कोणतीही गोष्ट होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.