मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कोकण मंडळाची आगामी घरांची सोडत ही दिवाळीच्या दिवसात काढली जाण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. या सोडतीमध्ये जवळपास 2 हजार 500 घरांचा समावेश असू शकतो. सोडतीसंदर्भात जाहिरात ही दसऱ्याच्या आसपास प्रसिद्ध केली जाऊ शकते, अशी माहिती मंडळातील वरिष्ट अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दिवाळीत म्हाडाच्या घरांची लॉटरी?
मिळालेल्या माहितीनुसार, या सोडतीमधील सुमारे 1,300 घरे ही 20 टक्के गृहनिर्माण योजनेतून उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तर खाजगी विकासकांकडून म्हाडाला हस्तांतरित करण्यात आलेल्या या घरांच्या आगामी सोडतीमध्ये समावेश केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत म्हाडाला मिळणाऱ्या घरांची ही शेवटची सोडत असेल, अशी शक्यता आहे.
हेही वाचा-ST प्रवाशांसाठी मोठी बातमी! पास काढण्याची पद्धत बदलली,जाणून घ्या नवी प्रक्रिया
अशा असतील घरांच्या किंमती?
20 टक्के योजनेमधील घरांच्या संभाव्य किंमत या साधारण 20 ते 25 लाख रुपये इतरी असू शकते. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली तसेच वसई-विरार या परिसरात ही घरे उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिवाय अल्प उत्पन्न गटामधील नागरिकांना या घरांचा लाभ मिळतो.
या दरम्यान, खाजगी विकासकांच्या काही प्रकल्पांमधून अजून काही घरे ही म्हाडाकडे उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती ही सध्या संकलित केली जाणार आहे. त्यासह मागील सोडतीनंतर लाभार्थ्यांनी घेतलेली किंवा अद्याप दावा न केलेही घरेही तपासली जात आहेत. अशी घरे ही तपासली जात आहेत. अशी घरे उपलब्ध असल्याचा त्यांचा नव्या सोडतीत समावेश केला जाऊ शकतो.