Mumbai News : वाहतूक कोंडीवर नवा प्रयोग;MMRDAचा एआय सॉफ्टवेअर आणि ड्रोन सर्वेक्षण

ठाणे आणि मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने एआय सॉफ्टवेअर आणि ड्रोन सर्वेक्षणाचा नवा प्रयोग सुरू केला आहे.

Mumbai News : वाहतूक कोंडीवर नवा प्रयोग;MMRDAचा एआय सॉफ्टवेअर आणि ड्रोन सर्वेक्षण

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता नवीन तांत्रिक मदत घेण्यात येणार आहे. या संदर्भात मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीएला) महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ड्रोनच्या मदतीने वाहतूक परिस्थितीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर योग्य उपाययोजना आखून कोंडी कायमस्वरूपी दूर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

ठाण्यात शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये आरोग्य सेवा, शाळांची सुधारणा, स्मार्ट प्रकल्प, पर्यटनविकास आणि वाहतूक व्यवस्थापन यांवर चर्चा झाली. शिंदे यांनी सांगितले की, ठाणे परिसरातील वाहतूक व्यवस्थेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एमएमआरडीए अभ्यास करणार आहे. यामुळे योग्य नियोजन होऊन नागरिकांना होणारा त्रास कमी होईल.

हेही वाचा: PM Modi Mumbai Visit Postponed: पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा पुढे ढकलला; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत मोदींशी चर्चा

याशिवाय, मेट्रो मार्गांचा सुलभ वापर, तसेच बोरिवली परिसरात पूर्ण झालेल्या बोगद्याचा फायदा होऊनही वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल, असे शिंदे यांनी नमूद केले. जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी 39 ठिकाणांना पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्यात आली असून, यामुळे स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल.

बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी सांगितले की, तांत्रिक साधनांचा योग्य वापर आणि नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे राबवली, तर ठाण्यासह संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीची समस्या सोडवणे शक्य होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number