मुंबई : निवडणूक मतदार याद्यांमधील घोळाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्याचा मोर्चाचं आवाहन केल असून आज हा मोर्चा चर्चगेट काढला जाणार आहे. या मोर्चासाठी राज ठाकरे यांनी दादर ते चर्चगेट असा मुंबई लोकलने तिकीट काढून प्रवास केला. या दरम्यान, राज ठाकरे यांच्यासोबत नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आदी मनसे नेते उपस्थित होते. राज ठाकरे चर्चगेटला दाखल झाले असून थोड्याच वेळात मोर्चाला सुरूवात होणार आहे. हा मोर्चा मविआम आणि मनसे यांनी संयुक्तरित्या काढला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा : Weather Update: महाराष्ट्रावर पावसाचे सावट, अरबी समुद्रात डिप डिप्रेशन अन् विदर्भात कमी दाबाचा पट्टा