मुंबई : राज्य सरकारने बडगा उगारताच टँकर चालकांनी संप मागे घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे घेतला गेला आहे. संप मागे घेतल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टँकर चालकांनी मागील चार दिवसांपासून संप केला होता. अखेर आजच्या चौथ्या दिवशी टँकर चालकांनी त्यांचा संप मागे घेतला आहे. आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला अशी माहिती वॉटर टँकर असोसिएशन शिष्टमंडळाने दिली आहे. मुंबईतील टँकर चालकांनी संप मागे घेतला पण औपचारिक घोषणा बाकी आहे. थोड्याच वेळात संप मागे घेतल्याचे जाहीर करणार आहेत. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून कुठलीही कारवाई केली जाणार नसल्याचं आश्वासन संघटनेला देण्यात आलं आहे.
हेही वाचा : बीड जिल्हा रुग्णालयात माता मृत्यूचे सत्र सुरू; सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि टँकर असोसिएशन यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. यानंतर आता टँकर चालकांनी संप मागे घेतला आहे. 450 टँकर मालक आहेत. 1800 विहिरी आहेत तर 2 हजार टँकर आहेत असे टँकर असोसिएशनचे सेक्रेटरी राजेश ठाकूर यांनी सांगितले.
संपाचे कारण काय?
केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून (CGWA) खाजगी विहिरींना मिळणाऱ्या एनओसीबाबत नवीन अटी लागू करण्यात आल्यामुळे टँकर मालकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत संप पुकारला आहे. मुंबई महानगरपालिकेनेकेंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून एनओसी बंधनकारक केल्यामुळे टँकर चालक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आणि संपाची घोषणा केली. या नोटिसा सध्या 15 जूनपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.