Maharashtra Weather: नववर्षच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना हवामानाने अनपेक्षित धक्का दिला. हिवाळ्याच्या दिवसांत सहसा कोरडं वातावरण अनुभवायला मिळत असताना, गुरुवारी पहाटेपासून शहरात पावसाच्या सरी कोसळू लागल्या. अचानक झालेल्या या पावसामुळे अनेक भागांत नागरिकांची तारांबळ उडाली.
दादर, कुर्ला, सायन, माटुंगा यांसह मध्य आणि पूर्व उपनगरांमध्ये सकाळी जोरदार सरी पडल्याचे चित्र दिसले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ऑफिस, कॉलेज किंवा कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पावसामुळे गैरसोय सहन करावी लागली. अनेक ठिकाणी रस्ते ओले झाल्याने वाहतूक संथ झाली,.
#WATCH | मुंबई: शहर के कुछ हिस्सों में बारिश हुई। वीडियो वालकेश्वर इलाके से है। pic.twitter.com/77bbUqpG7L — ANI_HindiNews (@AHindinews) January 1, 2026
हिवाळ्यात पाऊस पडल्याने हवामानात गारवा जाणवू लागला आहे. सकाळी लवकर बाहेर पडलेल्या नागरिकांनी छत्री किंवा रेनकोट नसल्यामुळे अचानक आलेल्या पावसात अडकण्याची वेळ आली. रेल्वे स्थानकांबाहेर आणि बसथांब्यांवर लोकांची गर्दी वाढल्याचेही पाहायला मिळाले.
हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बदलांमुळे आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे हा पाऊस पडत आहे. हा पाऊस दीर्घकाळ टिकण्याची शक्यता कमी असली, तरी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी आखलेल्या काही मैदानी योजना पावसामुळे पुढे ढकलाव्या लागल्या, तर काहींनी पावसातच नववर्षाचा आनंद घेतला. अचानक आलेल्या या पावसामुळे नववर्षाची सुरुवात मुंबईकरांसाठी लक्षात राहणारी ठरली आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर कमी होईल, मात्र नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.