Dust Storm: मुंबईकरांनो घरातच राहा! ठाणे, नवी मुंबईत धुळीच्या वादळाचा हाहाकार; पाहा धडकी भरवणारे व्हिडीओ

सोसाट्याचा वारा आणि हवेतील धुळीमुळे दृश्यमानता (Visibility) कमालीची घटली असून, स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dust Storm: मुंबईकरांनो घरातच राहा! ठाणे, नवी मुंबईत धुळीच्या वादळाचा हाहाकार; पाहा धडकी भरवणारे व्हिडीओ

Dust Storm: ठाणे आणि नवी मुंबई परिसराला गुरुवारी संध्याकाळी भीषण धुळीच्या वादळाने (Dust Storm) झोडपून काढले. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, शिलफाटा, ऐरोली आणि दिघा परिसरात धुळीचे प्रचंड लोट आकाशात पसरल्याचे पाहायला मिळाले. सोसाट्याचा वारा आणि हवेतील धुळीमुळे दृश्यमानता (Visibility) कमालीची घटली असून, स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झाडे पडण्याच्या आणि कचरा हवेत उडण्याच्या घटनांमुळे प्रशासनाकडून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील 1 तासासाठी धुळीच्या वादळाचा इशारा
दरम्यान, ‘Mumbai Rains’ या संस्थेने सोशल मीडियावरून ठाणे आणि एमएमआर (MMR) क्षेत्रासाठी तत्काळ इशारा जारी केला आहे. पुढील 1 तासासाठी धूळ-वादळाचा धोका कायम असून नागरिकांनी खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज असतानाच अचानक आलेल्या या वादळाने जनजीवन विस्कळीत केले आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी 9 मेपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

धुळीच्या वादळाचा व्हिडीओ – 

मान्सूनपूर्व पावसाची पहिली फेरी आणि ‘यलो अलर्ट’
हवामान तज्ज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ अथरेय शेट्टी यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, शहापूर, मुरबाड, बदलापूर आणि कर्जत परिसरातून पावसाचे ढग पश्चिमेकडे सरकत आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ‘AccuWeather’ ने देखील नवी मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला असून, आज संध्याकाळी एमएमआर परिसरात मान्सूनपूर्व पावसाची पहिली हजेरी लागण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग; अचानक उतरवलं जुहू एअरपोर्टवर

उष्णतेच्या लाटेत निसर्गाचा कोप
एकीकडे नवी मुंबई आणि ठाण्यात कमाल तापमान 37°C च्या आसपास पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते, त्यातच या धुळीच्या वादळाने भर घातली आहे. दरम्यान, खोपोली परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाल्याचे व्हिडिओ समोर आले असून, हे पावसाचे ढग आता मुंबईच्या दिशेने सरकत आहेत. वादळामुळे वाहनचालकांनी सावधगिरीने वाहने चालवावीत आणि शक्य असल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number