नवी मुंबईत मंगळवारी 16 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद; ‘या’ भागावर होणार परिणाम

नवी मुंबई महानगरपालिकेकडून दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते बुधवार, 7 ऑक्टोबर रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत मुख्य वाहिनीवरील पाणी बंद ठेवले जाईल.

नवी मुंबईत मंगळवारी 16 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद; ‘या’ भागावर होणार परिणाम
water cut

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवर तातडीचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील मोठ्या भागासह सिडकोच्या काही नोड्समध्ये सलग 16 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडून दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते बुधवार, 7 ऑक्टोबर रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत मुख्य वाहिनीवरील पाणी बंद ठेवले जाईल. या कालावधीत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील चॅनेल विलगीकरण, नवीन मीटरिंग किऑस्क उभारणे, फ्लो मीटर बसवणे आणि सीबीडी, वाशी तसेच महापे येथे मोठ्या व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. दुरुस्तीचे काम संपल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल; मात्र बुधवार, 7 ऑक्टोबर रोजी दिवसभर सखल व उंच भागात कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बेलापूरपासून ऐरोलीपर्यंत ८ विभाग अन् कामोठे-खारघरवर परिणाम; नागरिकांची तारांबळ उडणार

पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या कालावधीत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या सर्व 8 प्रमुख नोड्सचा समावेश आहे. यासोबतच सिडकोच्या अखत्यारीत येणाऱ्या खारघर आणि कामोठे या नोड्समधील पाणीपुरवठाही पूर्णपणे ठप्प राहील. अचानक पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नवी मुंबईकरांची मोठी धावपळ होणार आहे. प्रशासनाने नागरिकांना आधीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवण्याचे आणि दुरुस्तीच्या काळात पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर! राजकीय घडामोडींना वेग, पुण्यातील महायुतीच्या पेचावर तोडगा निघणार?

मोरबे धरणात ९३ टक्के पाणीसाठा, तरीही वाढत्या उष्णतेमुळे भविष्यातील टंचाईचे आव्हान

यंदा अपुरा पडलेला पाऊस आणि जागतिक हवामान बदलामुळे मोरबे धरणातील पाणीसाठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत धरणात सुमारे 93 टक्के पाणीसाठा उपलब्ध असला, तरी ऑक्टोबर महिन्यातील तीव्र उष्णता आणि पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंतचे पाण्याचे नियोजन पाहता महापालिका सतर्क झाली आहे. टाक्या भरून पाणी वाहून जाऊ न देणे, साठवलेले पाणी न फेकणे आणि गळती असल्यास तातडीने दुरुस्त करणे अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number