नवरात्रीनिमित्त ठाणे-कल्याणमध्ये वाहतुकीत मोठे बदल! काही मार्गांवर नो एन्ट्री; पर्यायी मार्ग कोणते, जाणून घ्या

नवरात्र उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. देवीच्या आगमनावेळी भाविकांची मोठी गर्दी होत असते

नवरात्रीनिमित्त ठाणे-कल्याणमध्ये वाहतुकीत मोठे बदल! काही मार्गांवर नो एन्ट्री; पर्यायी मार्ग कोणते, जाणून घ्या

नवरात्र उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. देवीच्या आगमनावेळी भाविकांची मोठी गर्दी होत असते. वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे बदल केले आहेत.

ठाण्यातील टेंभी नाका येथील दुर्गा देवी मंदिर आणि कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसरात नवरात्रात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

येत्या ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत दररोज दुपारी ४ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ठाणे आणि कल्याणमधील अनेक प्रमुख मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू असतील. विशेषतः अवजड वाहने, लक्झरी आणि खाजगी बसेसना या मार्गांवर प्रवेश बंद असणार आहे.

तुमच्या शहरातील वाहतूक बदल जाणून घ्या

मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी- मुलुंड चेक नाक्यामार्गे ठाण्यात येणाऱ्या बसेसना तीन हात नाका, कॅडबरी सिग्नलच्या आधीच वळवले जाईल. ही वाहने एक्सप्रेस हायवे – गोल्डन डाईज नाका – साकेत रोड – नवीन कळवा पूल मार्गे जातील.

नवी मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी- कळवा पुलावरून ठाण्यात येणाऱ्या चारचाकी आणि मालवाहू वाहनांना किका नाक्याच्या पुढे जाता येणार नाही. त्यांना साकेत रोड आणि महालक्ष्मी मंदिर मार्गे जावे लागेल.

हेही वाचा – ‘लवकरच चांगली बातमी मिळेल…’; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर MPSC विद्यार्थ्यांना आवाहन

ठाणे स्टेशनकडून येणारी वाहने- स्टेशनकडून टेंभी नाक्याकडे जाणारी वाहने चिंतामणी ज्वेलर्सजवळ थांबवली जातील. त्यांना टॉवर नाका – गडकरी सर्कल – अल्मेडा चौक – नितीन सिग्नल मार्गे वळवले जाईल.

कल्याण शहरातील वाहतूक बदल-
नवी मुंबई, पनवेल, मुंब्राकडून पत्रीपूलमार्गे कल्याणमध्ये येणारी वाहने कल्याण नाक्यावरच थांबवली जातील. मुंब्रा बायपास आणि खारेगाव टोल नाका हा पर्यायी मार्ग असेल. खोनी निसर्ग ढाब्याकडून कल्याणकडे येणारी अवजड वाहने खोनी येथेच थांबवली जातील. त्यांना बदलापूर – अंबरनाथ – कताई – कल्याण फाटा मार्गे जावे लागेल. नेवली नाक्याहून कल्याणमध्ये येणारी वाहने नेवली नाक्यावर थांबवली जातील. बदलापूर-अंबरनाथ महामार्ग हा पर्याय असेल.
श्रीराम चौकातून येणारी वाहने श्रीराम चौकात थांबवून उल्हासनगर, शहाडकडे वळवली जातील. तर शहाडहून येणारी वाहने आभारवाडी चौकातून गांधारी पूल-बापगाव मार्गे वळवली जातील.

मात्र पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number